पुणे – लोकसभा निवडणूक प्रक्रिया देशभरात सुरू असून तिसऱ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहे. सोबतच अनेक आमदार, खासदार तसेच सेलिब्रिटींही मतदान करत आहे. अभिनेते सुबोध भावे यांनीही बुधवार पेठ येथील नूतन समर्थ मतदान केंद्र येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदान पुणे लोकसभा मतदारसंघातून ३१ उमेदवार रिंगणात आहे. या उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) बंद होणार आहे.