सुबोध भावे आणखी एका ‘बायोपिक’मध्ये झळकणार?

मुंबई – मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या बायोपिकची जोरदार चलती आहे, त्यातही मराठी बायोपिक आणि अभिनेता ‘सुबोध भावे’ यांचे एक समीकरण जुळले आहे. ‘लोकमान्य’, ‘बालगंधर्व’ आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ नंतर सुबोध आता आणखी एका भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लेखक राजेश देशपांडे आणि श्रीकांत बोजेवार हे दोघे मिळून लवकरच एक नवीन चित्रपट घेऊन येणार आहेत. आचार्य अत्रे म्हणजेच ‘प्रल्हाद केशव अत्रे’ यांच्या आयुष्यावर हा चित्रपट असणार आहे. तूर्तास तरी या चित्रपटात अत्रेंची भूमिका ‘सुबोध भावे’ साकारणार असल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)