प्रमाणपत्रांबाबतचा अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करा – अभाविप 

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या 54व्या दिक्षांत समारंभात दुबार छपाई केलेल्या पदवी प्रमाणपत्रांबाबतचा अहवाल शुक्रवारी (दि. 22) होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करावा. या दुबार छपाईचा खर्च दोषींकडून वसूल करावा, अन्यथा कुलगुरुंना घेराव घालण्यात येईल. तसेच ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) प्रांतसहमंत्री साधना वैराळे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

वैराळे म्हणाल्या, या पदवी प्रमाणपत्रांतील सहीचा गोंधळ, दुबार छपाईमधील आर्थिक नुकसानाबाबत अभाविपने दि. 16 जुलै 2018 रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवेळी आंदोलन केले. त्यामध्ये या प्रमाणपत्राबाबत झालेल्या आर्थिक नुकसानाबाबत विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला. त्यामुळे प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली. या समितीच्या अहवालाबाबत गेल्या आठवड्यात आम्ही कुलगुरुंकडे विचारणा केली. त्यावर त्यांनी अहवाल सादर झाला असून दि. मार्चला होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर केला जाणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)