“त्या’ 35 कारखान्यांची यादी सादर करा : हायकोर्टाचे आदेश

चार कारखान्यांना गाळप परवाना द्या

मुंबई: 2011 ते 2017 या काळात शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकविणाऱ्या “त्या’ 35 साखर कारखान्यांची यादी सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. तसेच गेल्या वर्षाच्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकविल्यामुळे चालु हंगामासाठी गाळप परवाना रोखण्यात आलेल्या त्या चार साखर कारखान्यांना दिलासा देत चालु हंगामासाठी ऊस गाळप परवाना देण्याचे आदेश दिले.

साखर कारखान्याकडून 2017-18च्या गळीत हंगामात एफआरपीनुसार ऊस बिल मिळाले नसल्याने सामाजिक कार्यकर्ता गोरख घाडगे आणि सिध्दापूर येथील सुनिल बिराजदार यांच्यासह 11 शेतकऱ्यांच्या वतीने ऍड. आशिष गायकवाड यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी एफआरपीची 50 टक्केहून जादा रक्कम भरलेल्या वसंतदादा शेतकरी साखर कारखाना (सांगली), शुभू महादेव साखर कारखाना (पुर्णा) साखर कारखान्यासह चार कारखान्यांना चालु हंगामासाठी उस गाळप परवाना देण्याचे आदेश दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)