राफेलच्या किंमतींचा तपशील सादर करा : सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारला आदेश

नवी दिल्ली  – सर्वोच्च न्यायालयाने आज राफेलच्या संबंधात महत्वपुर्ण आदेश सरकारला देताना सरकारने जी 36 विमाने खरेदी केली आहेत त्याच्या किंमतीचा तपशील दहा दिवसात कोर्टात सादर करण्याची सुचना केली आहे. हा तपशील बंद लखोट्यात सादर करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र ही माहिती गुप्त ठेवण्यात येईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज हा आदेश दिला. तथापी हा तपशील अत्यंत संवेदनशील असल्याने तो संसदेतही सादर करता येणार नाही असा सरकारला काहीसा दिलासा देणारा निर्णयही दिला आहे. गुप्त किंवा व्युहात्मक महत्वाचा भाग वगळून राफेल प्रकरणाच्या निर्णय प्रक्रियेची माहिती मात्र जनेला मिळायला हवी असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारने किंमतीचा तपशील दहा दिवसात सादर करावा आणि त्यावर याचिकाकर्त्याने आपले म्हणणे पुढील सात दिवसांत द्यावे असा आदेश देत न्यायालयाने या विषयाची सुनावणी 14 नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलली. राफेल गैरव्यवहाराच्या संबंधात एकूण चार याचिका सर्वोच्च न्यायालयापुढे विचारार्थ आहेत. त्या याचिकांची एकत्रित सुनावणी सर्वोच्च न्यायालयापुढे आहे त्या अनुषंगाने त्यांनी आज हा आदेश दिला.

या याचिकांमध्ये प्रशांत भुषण तसेच अरूण शौरी, यशवंत सिन्हा यांनी दाखल केलेल्या याचिकांचा समावेश आहे. आज यावर सुनावणी झाली तेव्हा सरकारतर्फे बाजू मांडताना ऍटर्नी जनरलनी सांगितले की या विमानांच्या किंमती जाहीर करता येणे शक्‍य नाही कारण आम्ही संसदेतही ही माहिती दिलेली नाही. त्यासंबंधात न्यायालयाने स्पष्ट केले की कोणत्याही याचिकाकर्त्याने विमानांच्या गुणवत्तेविषयी आक्षेप घेतलेला नाही. याची निर्णय प्रक्रिया आणि विमानांच्या किंमती या विषयी याचिकाकर्त्यांना शंका आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)