शौनक चॅटर्जी, आर्या बोरकर यांचे संघर्षपूर्ण विजय

रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धा

मुंबई – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 13व्या योनेक्‍स सनराईज-एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात शौनक चॅटर्जी, अभिराम निलाखे, पियुष जाधव यांनी तर, मुलींच्या गटात आर्या बोरकर, अनन्या सिन्हा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्‍स येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात आर्या बोरकरने रेवा रावलानीचा टायब्रेकमध्ये 9-8(4) असा पराभव केला. आदिती भट हिने दीपा याझनीचा 9-5 असा पराभव करून आगेकूच केली.

सविस्तर निकाल :

12 वर्षाखालील मुली – एंजल पटेल वि.वि.सिया प्रसादे 9-4, रिशीथा बासिरेड्डी वि.वि.मनोज्ञा मदसू 9-5, आर्या बोरकर वि.वि.रेवा रावलानी 9-8(4), आदिती भट वि.वि.दीपा याझनी 9-5, माही खोरे वि.वि.जैनी पटेल 9-0, अनन्या सिन्हा वि.वि.वेंकटेश सुखी 9-4.

12वर्षाखालील मुले – शौनक चॅटर्जी वि.वि.ईशान संपत 9-7, पियुष जाधव वि.वि.वीर विनायक 9-1, अयान कुरेशी वि.वि.जय शर्मा 9-1, अर्जुन कीर्तने वि.वि.इमोन भट्ट 9-2, अथर्व राऊत वि.वि.क्रिशव सिंग 9-4, विवान कारंडे वि.वि.पृथ्वी गुलानी 9-0, अभिराम निलाखे वि.वि.अर्जुन बाबू 9-2.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)