#AUSvIND : तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे 346 धावांची आघाडी

मेलबर्न – जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सर्वबाद 151 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघास पहिल्या डावात 292 धावांची भक्कम आघाडी मिळाली. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 तर रविंद्र जडेजाने 2 , शमी आणि इशांतने प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर मात्र भारतीय संघाची दुसऱ्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली आहे.

भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 54 धावा केल्या आहेत. सलामावीर हनुमा विहारी 13 धावांवर माघारी परतल्यावर भारताचे भरवशाचे फलंदाज विराट कोहली, चेतेश्वर पूजारा हे शून्यावर बाद होऊन तबूंत परतले आहेत. तर अजिंक्य रहाणे हा 1 आणि रोहित शर्मा 5 धावा काढून बाद झाले. त्यामुळे भारताची दुसऱ्या डावांची सुरूवात ही अतिशय निराशजनक झालेली असली तरी पहिल्या डावातील 292 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 54 धावा मिळून भारताकडे एकूण 346 धावांची भक्कम आघाडी झालेली आहे.

ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने भारताचे 4 गडी बाद केले तर जोश हेजलवूडने 1 गडी बाद केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मयंक अग्रवाल नाबाद 28 आणि ऋषभ पंत हा 6 धावांवर खेळत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)