विद्यार्थ्यांच्या विकासाचा ध्यास : ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल

– दीपक मदने

ईश्‍वरकृपा शिक्षण प्रसारक मंडळातर्फे गुणवरे (फलटण) येथे 2014 मध्ये ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज 2014 साली सुरू करण्यात आले. नर्सरी, एल. के. जी. एच. के. जी. असे वर्ग सुरू करण्यात आले. सध्या इयत्ता पाचवीपर्यंत वर्ग सुरू आहेत. विविध सोयी-सुविधा व उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यासच या संस्थेने घेतला आहे.

बदलत्या काळातील शैक्षणिक परिस्थिती लक्षात घेवून ग्रामीण भागातील मुलांना शहरी भागासारखे इंग्रजी शिक्षण तसेच शहरी भागातील सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा निश्‍चय करून ईश्‍वरकृपा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ईश्‍वर आप्पाजी गावडे व सचिव सौ. साधना संभाजी गावडे यांनी अल्पावधितच स्वप्न सत्यात उतरवलेही. स्कूलसाठी दुमजली इमारत बांधण्यात आली. पिंप्रद, वडले, वाजेगाव, टाकळवाडे, निंबळक, मठाचीवाडी, राजाळे, सरडे, खटकेवस्ती, गोखळी, पवारवाडी, आसू, शिंदेवाडी, हनुमंतवाडी, तामखडा, मुंजवडी, राजुरी, बरड, खटकेवस्ती, गुणवऱ्यासह 25 गावातील विद्यार्थी स्कूलबसने ये-जा करतात. माहिती व तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे म्हणून सुसज्ज संगणक कक्ष व डिजीटल क्‍लासरूमची सोयही करण्यात आली. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी स्नेहमेळावे घेतले जातात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांविषयी माहिती देण्यासाठी दर महिन्याला पालक सभा घेतली जाते. ऐतिहासिक वास्तू व स्थळांना शैक्षणिक सहलीच्यानिमित्तने भेटी दिल्या जातात. लोकसेवा व राज्यसेवा परीक्षांची आवड निर्माण व्हावी म्हणून शालेय स्तरावर परीक्षा व मार्गदर्शन वर्ग घेतले जातात.

विद्यार्थ्यांसाठी दररोज योगासने, प्राणायामाचे क्‍लास घेतले जातात. त्याचबरोबर मैदानी खेळामंध्ये धावणे, कबड्डी, लांब उडी, कुस्ती, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल आदी खेळ मुले-मुलींना शिकवले जातात. विद्यार्थी शरीराने तंदरूस्त व मनाने खंबीर कसा होईल, याकडे विशेष लक्ष दिले जाते. सर्व सण, उत्सव साजरे करून भारतीय संस्कृतीचे जतन करण्यात येते. राष्ट्रपुरूषांच्या जयंती, पण्यतिथी साजऱ्या केल्या जातात. ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जाते. गरीब, आर्थिक दुर्बल मुलांना स्वेटर व कपडे मोफत देण्यात येतात. यासह विविध सामाजिक कार्यात ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल आघाडीवर असते. विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा व्हावा, यासाठी ऍबॅकसचे विशेष क्‍लास घेतले जातात. शाळेची इमारत ही निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे. शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. शाळेचा संपूर्ण परिसर व क्‍लासरूम हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेकीखाली आहे. शाळेच्या सुरक्षिततेसाठी मोठे वॉल कंपाउंड बांधण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ईश्‍वरकृपा शिक्षण संस्था नेहमी कटिबध्द राहिल व विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य हाच आमचा ध्यास हेच उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढील वाटचाल करीत आहे, असे संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे या आवर्जून नमूद करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)