राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण मिळणार – विनोद तावडे

मुंबई: सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत राज्यातील 13 भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने शुभारंभ झाला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे बोलत होते. 

विनोद तावडे म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण मिळावे यासाठी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांमधून 13 शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्याथ्याची गुणवत्ता सिद्ध करणारा हा शिक्षणक्रम तयार करण्यात आला आहे. पुढच्या वर्षी 100 शाळांमध्ये हा शिक्षणक्रम राबविण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांची आवड ओळखून त्या क्षेत्रात त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न या शाळांमधून करण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षकांची निवड करण्यात आली असून, जागतिक स्पर्धेत स्थान प्रस्थापित करणारा विद्यार्थी या शाळांमधून घडणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रकाश जावडेकर म्हणाले, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्व शिक्षा अभियानास सुरुवात केली. त्यांच्या जयंतिनिमित्त आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ म्हणजे त्यांचे अभियान खऱ्या अर्थाने सार्थक करणे होय. पारंपरिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना न देता कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम हे या शिक्षण मंडळाचे वैशिष्ट्य आहे. ऑपरेशन डिजिटल बोर्ड ही संकल्पना पुढील तीन वर्षांत ९ वी ते १५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १५ लाख वर्ग खोल्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 पंकजा मुंडे म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या प्रगतीत शिक्षणाचा मोठा वाटा असतो आणि हसत खेळत शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. गुणांचा आणि कौशल्याचा विकास , बुद्धीवर्धन अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था शिक्षण विभाग करीत आहे, असे सांगून श्रीमती मुंडे यांनी शिक्षण विभागाचे अभिनंदन केले.

 

या डिजिटल शुभारंभावेळी संबंधित अधिकारी, विविध शाळांचे विद्यार्थी आणि राज्यातील १३ विविध ठिकाणी विद्यार्थी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)