पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा निवास होणार सुखाचा

गंजलेल्या तावदाने व सायकलींपासून बनविली बॅरिकेट्‌स

– अर्जुन नलावडे 

पुणे – पूर्वी विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहाचे रूप हळूहळू पालटू लागले आहे. वसतिगृहाच्या आवारात पाण्याची टाकी बांधण्याचे, खोल्यांचे डागडूजीचे काम, तसेच स्वच्छगृहातील नळदुरुस्तीचे काम आणि वाहनतळाचे काम, उद्यान उभारण्याचे काम, तसेच बायोमेट्रीक सिस्टिमचे काम जोमाने सुरू असल्याचे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या सायकली आणि दुचाकी लावण्याची प्रश्‍न निर्माण झाला होता. याची दखल घेऊन वसतिगृह प्रशासनाने वसतिगृह क्रमांक-3 च्या पाठीमागील बाजूस प्रशस्त वाहनतळ उभारून पार्किंगचा प्रश्‍न निकाली काढला आहे. यापूर्वी मुलांच्या वसतिगृहाला विविध समस्यांचे ग्रहण लागले. त्यामध्ये पाणी वेळे न येणे, खोलीमध्ये पावसाचे पाणी जिरपणे, अपंग व्यक्तींना चालण्याचा रस्ता नसणे, प्रकाशदिव्यांची पुरेशी सोय नसणे, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, सायकल किंवा दुचाकींच्या पार्कची दुरवस्था, अशा अनेक समस्यांनी वसतिगृहे ग्रस्त होती. मात्र, आता प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या गैरसोईची दखल घेतलेली आहे. त्यामुळे वसतिगृहाचे एक-एक प्रश्‍न निकालात काढण्याचा जणू काही सपाटाच प्रशासनाने लावला आहे.

पाण्याची समस्या लक्षात घेऊन मोठ्या आकाराची पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू करण्यात आलेले निदर्शनास येत आहे. तसेच पावसाळ्यात मुलांच्या खोलींचा दुरवस्था होऊ नये म्हणून अगोदरपासूनच खोल्याची डागडूजी केली जात आहे. तसेच वसतिगृहाच्या आवारात नव्याने झाडे लावली जात असून परिसराची स्वच्छता वेळोवेळी होताना दिसत आहे. कामे होतात की, नाही याची खातरजमा स्वतः वसतिगृहप्रमुख करताना दिसतात. होणाऱ्या कामांमुळे विद्यार्थीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

भंगार साहित्यांचा वापर सुयोग्य कामासाठी…
मुलांच्या वसतिगृहांच्या आवारात अनेक वर्षांपासून भंगार झालेल्या सायकली, खराब झालेली लोखंडी तावदाने आणि गंजलेल्या पाईप्स यांचा साठा जास्त होता. म्हणून वसतिगृह प्रशासनाकडून गंजलेल्या सायकली आणि लोखंडी खराब झालेली तावदाने भंगारात न विकता त्यांच्या सांगड्यांपासून बॅरिकेट्‌स तयार करण्यात आली आहेत. तसेच पाईप्सचा वापर नव्यान तयार केलेल्या प्रशस्त वाहनतळाच्या नियोजनासाठी करण्यात आला आहे. यामुळे “टाकाऊपासून टिकाऊ’ याचा प्रत्यय वसतिगृहाच्या आवारात फिरताना येत आहे.

सुरुवातीला वसतिगृहात आलो, त्यावेळी आम्हाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र, विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची आणि आंदोलनांची दखल घेऊन वसतिगृह प्रशासनातर्फे विविध समस्या सोडविल्या जात आहेत. मात्र, काही ठिकाणी काही समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. वसतिगृहाच्या आवारात नव्याने उभ्या केल्या जात असलेल्या उद्यानामध्ये खुली व्यायामशाळा (ओपन जिम)ची व्यवस्था करावी.
– अंकुश शिंदे, विद्यार्थी.


नवनवीन उपक्रम राबविताना विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही आडकाठी आणली नाही. मग, आम्ही प्लंबर, सुतार यांच्याशी चर्चा करून जुन्या काढण्यात आलेल्या खिडक्‍या, भंगार झालेल्या सायकलींचा वापर करून त्यापासून वाहनतळासाठी लागणाऱ्या बॅरिकेट्‌स तयार केले. त्याचबरोबर पिण्याचे पाणी आणि वापरावयाचे पाणी वेगळ्या पद्धतीने साठविण्याची व्यवस्था केली. जुन्या खराब झालेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी वाहून जायचे, त्यामुळे प्रशासनाकडून आता 80 हजार लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधली जात आहे. तसेच वसतिगृहाच्या आवाकरात उद्याने उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे.
– प्रा. टी. डी. निकम, वसतिगृह प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)