एम.फील., पीएच.डी.चे विद्यार्थी आमरण उपोषणाच्या पवित्र्यात

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.फील., पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याच्या मागणीसाठी गेल्या अकरा दिवसांपासून धरणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ पातळीवर दखल न घेतल्याने बुधवार (दि.18) पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

पुणे विद्यापीठ प्रशासनाने एम.फिल. व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विद्यावेतन रद्द केले आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी गेल्या अकरा दिवसांपासून विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने सर्वांना विद्यावेतन देणे शक्‍य नसल्याचे स्पष्ट केले करत पीएच.डी. करणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे समाधान न झाल्याने संशोधक विद्यार्थी समितीने आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)