अभाविप व संशोधन (Ph.D) करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधन (Ph.D आणि M-Phil) करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रलंबित असणाऱ्या प्रश्नावर आज विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घेतला. सातत्याने अभाविप व संशोधन (Ph.D) करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर आज यश आले.

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या सुरुवातीपासुन प्रलंबित असणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचा निर्णय आज विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. तसेच M-Phil करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष तरतूद म्हणून विद्यावेतन देण्याच्या सकारात्मक निर्णयाचा प्रस्ताव येत्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात येणार असून एका महिन्यात ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा विद्यापीठाने आज केली आहे. सदर प्रश्नासाठी अभाविप व संशोधन (Ph.D) करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वेळोवेळी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी अभाविपचे पुणे महानगर मंत्री श्री. अनिल ठोंबरे म्हणाले, “विद्यापीठाने आज घेतलेल्या या निर्णयामुळे संशोधन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अखेर मिळाला आहे. अभाविप ह्या निर्णयाचे स्वागत करते तसेच सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)