दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील

नागठाणे – ग्रामीण भागातील मुलांमध्ये अंगभूत कलाकौशल्ये असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन लाभले तर त्यांचे भावविश्व खऱ्या अर्थाने फुलते. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी एरवी आकाशकंदील म्हणजे दुर्लभ गोष्ट. मात्र ठोसेघर भागातील मोरबाग शाळेच्या मुलांनी नवनिर्मितीचा प्रत्यय देताना स्वतः आकाशकंदील तयार केले आहेत. त्यातून यंदाच्या दिवाळीत प्रथमच इथली घरे आकाशकंदीलाच्या प्रकाशात उजळणार आहेत.

मोरबाग हे सातारा तालुक्‍यातील गाव. ठोसेघर परिसरात वसलेले. गावाचा समावेश दुर्गम भागात होतो. भोवताली सर्वत्र जंगल. अशा गावातील शाळेत अलीकडेच आकाशकंदील तयार करण्याची आगळीवेगळी कार्यशाळा झाली. ती सर्वांसाठी कौतुकाचा विषय बनली. एरवी इथल्या मुलांसाठी आकाशकंदील ही तशी दुर्लभ गोष्ट. मात्र यंदाच्या दिवाळीत मुलांनी स्वतःच्या हातांनी बनविलेल्या आकाशकंदिलाची भेट घरच्यांना दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणेश शिंदे हे हरहुन्नरी शिक्षक. त्यांनी याकामी पुढाकार घेतला. श्री. शिंदे यांनी यापूर्वी विविध कार्यानुभव कार्यशाळांतून शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी त्यांनी मुलांना आकाशकंदील बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यासाठी फाईल कार्ड पेपर, टिंटेड पेपर, फ्लोरोसन पेपर, पताका पेपरचा वापर केले. त्यातून अत्यंत सुबक, आकर्षक आकाशकंदील आकारास आले. ते पाहून मुलांचे चेहरे हरखले. मुख्याध्यापक विश्वास कवडे, राहुल सावंत, विजय कदम यांनीही मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख दादाजी बागूल, शाळा समितीच्या अध्यक्ष छाया माने यांनी शाळेस भेट देऊन सर्वांचे कौतुक केले. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी जयश्री शिंगाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)