विद्यार्थ्यांना सैन्यात देशसेवा अन्‌ करिअर दुहेरी संधी 

निवृत्त एअर कमांडर गणेश जोशी 

राजगुरुनगर – भारतीय सैन्यातही विद्यार्थ्यांना देशसेवा व उत्तम करिअर अशा दोनही संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव व निवृत्त एअर कमांडर गणेश जोशी यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संरक्षणशास्त्र या विभागाद्वारे “निवृत्त सेनाधिकारी मुलाखत’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सुनील जाधव, उपमुख्याध्यापिका संध्या कांबळे, पर्यवेक्षक विलास खोमणे, संरक्षणशास्त्र विषय प्रमुख रविंद्र घुमे, विद्यार्थी समुपदेशन विभाग प्रमुख लतीफ शाह, विद्यालयातील अध्यापक, इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोशी म्हणाले, देशाचे रक्षण करण्यासाठी स्थलसेना, नौसेना व वायुसेना सदैव सज्ज आहेत. आज भारतीय सैन्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांबरोबरच शत्रूशी मुकाबला करण्यासाठी हवे असणारे डावपेच व रणनिती तयार आहे.

देशाच्या सीमांचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या सैनिकांकडून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. राष्ट्रप्रेम व राष्ट्रहितासाठी देशाच्या राष्ट्रीय संरक्षण व्यवस्थेत भाग घेऊन स्वतःचे आणि देशाचे भवितव्य घडवावे. विद्यालयातील अध्यापक लतीफ शाह यांनी एअर कमांडर गणेश जोशी यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन संरक्षण शास्त्र विषय प्रमुख रविंद्र घुमे यांनी केले. राजगुरूनगर महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संरक्षणशास्त्र या विभागाद्वारे “निवृत्त सेनाधिकारी मुलाखत’ या उपक्रमाअंतर्गत निवृत्त एअर कमांडर गणेश जोशी यांची मुलाखत घेताना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)