विद्यार्थी देखील हा एक ग्राहकच 

ग्राहक मंचकडून स्पष्ट : शाळा, महाविद्यालयाने फसवणूक केल्या दाद मागू शकतो 

मुंबई –
खरेदी करणारा किंवा सेवा घेणार हा ग्राहक मानला जातो. त्याच प्रमाणे विद्यार्थीही शाळेत फी भरून एका प्रकारे सेवा घेत असतो. त्यामुळे विद्यार्थी देखील एक ग्राहकच आहे, असे ग्राहक मंचाने स्पष्ट केले आहे. तसेच शाळा, महाविद्यालयांनी फसवणूक केल्यास तो ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतो, असे सांगितले. यामुळे अवाढव्य फी वाढविणा-या शिक्षणसम्राटांना चाप बसणार आहे.

गोरेगाव येथील ओबेरॉय इंटरनॅशनल शाळेत शिकणारा विद्यार्थीली आदित्या हिला शाळेने परीक्षेस बसण्यास परवानगी नाकारली होती. याविरुद्ध तिने ग्राहक मंचाला परवानगी मागितली. ग्राहक मंचाने विद्यार्थी नाहीत, असा निर्वाळा देत त्यांची याचिका फेटाळली. याविरोधात विद्यार्थी ग्राहक कसा नाही, अशी एक याचिका तिने दाखल केली.

-Ads-

विद्यार्थीही ग्राहकच असतो, असे पुरावा देणारे निर्णय तिने दाखवला. अखेर ग्राहक मंचाने तिची याचिका स्विकारली आणि शाळेविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली. आता शाळेने महाराष्ट्र शिक्षण समितीच्या किंवा युजीसींच्या कोणत्या नियमांचे उल्लंघन केले आहे का याचा अभ्यास करून ग्राहक मंच योग्य ती कारवाई करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)