#रक्षाबंधन : विद्यार्थिनींनी बनवल्या पर्यावरणपूरक राख्या

भावीनिमगाव – शेवगाव तालुक्‍यातील शहरटाकळी विद्यालयात मंगळवारी पर्यावरणपूरक राख्या बनवणे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य गणपत शेलार यांच्या कल्पनेतील टाकावू वस्तूंपासून पर्यावरणपूरक राख्या बनवण्यासाठी विद्यालयातील 5 वी ते 9 वी इयत्तेच्या 54 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

विद्यालयाचे कलाशिक्षक शीतलकुमार गोरे यांनी मुलांना राखी बनवण्याचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. कार्यशाळेत राख्या बनवण्यासाठी मुलांनी लोकर, दोरा, कागद, कापड व इतर टाकाऊ वस्तूंचा वापर करून आकर्षक व सुंदर राख्या बनवल्या.

अत्यंत कमी वेळ व खर्च करून बनवलेल्या या राख्या रक्षाबंधनाला आम्ही वापरून सण साजरा करणार असल्याचे यावेळी मुलांनी सांगितले. विद्यालयाच्या शिक्षिका अलका भिसे व रेखा आढाव यांनी मुलांना राखी बनवण्यासाठी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)