विद्यार्थी तक्रार निवारणासाठी समिती गठीत

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांची नेमणूक

पुणे – राज्य शासनाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या समितीमार्फत विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक किंवा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांचे प्रतिनिधी, कृषी विद्यापीठाचा प्रतिनिधी, उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हा सहाय्यक संचालक (समाजकल्याण), जिल्हा आदिवासी विकास अधिकारी, जिल्हा सहाय्यक संचालक यांची सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे. या समितीने दोन्ही योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याबाबत सर्व संस्थांमध्ये सूचनाफलक लावण्याबाबत सूचना द्यायच्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येऊ शकतो. या अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एकूण शुल्काच्या 50 टक्‍के शुल्क प्रवेश घेताना भरावे लागते. मात्र बहुतांश महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून 100 टक्के शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अशा तक्रारींचे निवारण समितीमार्फत केले जाणार आहे. तसेच अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमतेपैकी खुल्या प्रवर्गासाठी झालेले प्रवेश, त्यापैकी किती विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहाची सुविधा स्वतंत्ररित्या करणे आवश्‍यक आहे. या बाबींचा आढावा समितीमार्फत घेतला जाणार आहे. समिती स्थापन केल्यानंतर 15 दिवसांत कामाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)