मोदींच्या सभेला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; पाच गंभीर

लाउंज, कांग्रा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धर्मशाला येथील ‘जण आभार’ सभेला हजेरी लावण्यासाठी निघालेल्या ३५ विद्यार्थ्यांचा स्कुल बस दरीमध्ये कोसळून अपघात झाला आहे. हे सर्व विद्यार्थी एका संगणक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी असून त्यांचा कांग्रा जिल्ह्यातील जावली या दुर्गम भागातील नागमोडी रस्त्यावर अपघात झाला आहे.

या अपघातामध्ये ५ विध्यार्थ्यांना गंभीर इजा झाली असून इतरांना देखील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हिमाचल प्रदेशातील भाजप सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने धर्मशाला येथे पंतप्रधानांच्या ‘जण आभार’ सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)