वंचिताचा संघर्ष अजूनही सुरूच : डॉ. भारत पाटणकर 

नागठाणे- सर्व सामान्य माणसाचे राज्य येईल आणि शेतकरी, कामगार, कष्टकरी, मजूर अश्‍या समजातील मोठा वंचित वर्ग सुखी आणि समाधानी होईल असा ठराव ऑगस्ट क्रांती दिनी मुंबई मध्ये झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात झाला होता पण आजची स्थिती लक्षात घेतली तर आमची घोर निराशा झाली. कारण आजही आम्हाला हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे. म्हणजेच आजही वंचितांचा संघर्ष सुरूच आहे अशी प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

आर्टस अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे येथे क्रांतिसिंह इतिहास मंडळ व इतिहास विभाग आयोजित क्रांती दिनानिमित्त कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा आहे. ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटिश शासनाला स्वातंत्र्य प्राप्ती पर्यंत जेरीस आणण्याचे काम सातारा जिल्ह्याने केले आहे. प्रति सरकारच्या माध्यमातून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी हा लढा उभा केला होता. आमच्या हक्कासाठी संघर्ष करायला हवा तरच आपले हक्क मिळू शकतात.

-Ads-

याप्रसंगी त्यांनी सर्वांना आपल्या न्याय हक्कांसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. अशोक करांडे म्हणाले की, क्रांतिसिंह नाना पाटील आणि संत गाडगेबाबा यांनी लोकांना लोकांच्या भाषेत सांगून चेतविण्याचे, प्रेरणा देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. त्याचबरोबर’ शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी चले जाव ‘ च्या चळवळीत भूमिगत राहून कार्य केले. याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. तसेच समाजातील वंचित, दुर्लक्षित, कष्टकरी, मजूर, तळागाळातील माणसाचा विकास व्हावा, त्यांना न्याय मिळावा, त्यांना सुखाची झोप लागावी म्हणून गेले अनेक वर्षे झटणारे डॉ. भारत पाटणकर व डॉ. गेल आम्वेट यांचे कार्य सर्व समाजासाठी आदर्शवत आहे.

सदर कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका डॉ. गेल अँम्वेट, नागठाणे गावचे सरपंच विष्णु साळुंखे, कृषीभूषण मनोहर साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शेळके यांनी हा क्रांती दिन कार्यक्रम घेण्यामागची भूमिका विशद केली. पाहुण्यांचा परिचय इतिहास विभागाचे प्रमुख प्रा.थोरात यांनी, तर आभार डॉ. अजितकुमार जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. शिंदे यांनी केले. याप्रसंगी नागठाणे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थ्यी बहुसंख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)