साध्वी प्रज्ञा सिंहांच्या विरोधात सबळ पुरावे – रामदास आठवले 

नवी दिल्ली – २६/११ मधील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधानाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर चहुबाजूनी टीकेची झोड उठली होती. आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांचे वक्तव्य अतिशय निंदनीय असल्याचे आठवले यांनी म्हंटले असून जर आमच्या पक्षाला निर्णय घ्यायचा असता तर आम्ही कधीच त्यांना उमेदवारी दिली नसती.

रामदास आठवले म्हणाले कि, मालेगाव बॉम्बस्फोटात त्यांचं(प्रज्ञा सिंह) नाव होतं आणि तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे या प्रकरणात सबळ पुरावे होते. दहशतवाद्यांशी लढताना करकरे शहीद झाले. करकरे यांच्या संदर्भात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिलेल्या विधानाशी मी सहमत नाही. मी त्या विधानाचा निषेध करतो. आता न्यायालयाचं ठरवायचं आहे काय योग्य आणि काय अयोग्य आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, माझ्या शापामुळे करकरे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वक्तव्य केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)