तामिलनाडूतील धक्कादायक घटना – गर्भवतीला दिले एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्त

चेन्नई (तामिळनाडू): एका गर्भवती महिलेला एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्त देण्याचा धक्कादायक प्रकार तामिळनाडूत घडला आहे. आठ महिन्याची गर्भवती असलेल्या या महिलेला ऍनिमिया (रक्ताची कमी) असल्याने रक्‍त देण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला होता. दोन आठवड्यापूर्वी तिच्या कुटुंबीयांनी शिवकाशीच्या सरकारी हॉस्पिटलमधून एक युनिट रक्त आणले होते.

मात्र रक्त दिल्यानंतर तिची प्रकृती खालावत गेली, 24 डिसेंबर रोजी तिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे तपासणीत तिचे रक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. या घटनेनंतर सरकारने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रक्त दिल्यानंतर एचआयव्ही पॉझिटिव्ह होण्याची तामिळनाडूतील ही पहिलीच घटना आहे. सदर महिलेच्या काही दिवसांपूर्वीच तपासण्या केल्या होत्या. त्यात एचआयव्ही तपासणीही होती. तेव्हा तिचा एचआयव्ही निगेटिव्ह रिपोर्ट आला होता. जबाबदार अधिकाऱ्यांनी एनएसीओ (नॅशनल एड्‌स कंट्रोल ऑर्गनायझेशन) च्या गाईडलाईन्सकडे दुर्लक्ष केल्याचा महिलेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे.

विरधुनगर आरोग्य सेवेचो संयुक्त संचालक डॉ. आर मनोहरन यांनी या घटनेच्या सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. 30 नोव्हेंबर रोजी एका रक्तदात्याने रक्त दिले होते. ते एचआयव्ही पॉझिटिव्ह असण्याचा संशय आहे. या प्रकरणात सरकारी हॉस्पिटलमधील तीन कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. हे एचआयव्ही संक्रमित रक्त आणखी कोणा रुग्णाला तर दिले गेले नाही ना, याचा तपास करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)