प्राधिकरणातील कचरा उचलण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना साकडे

पिंपरी  – प्रभाग क्रमांक 15 मधील निगडी, प्राधिकरणातील कचरा गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे उचलला जात नाही. रस्त्यांची साफसफाई केली जात नाही. प्राधिकरणात सर्वत्र कचऱ्याचे ढिगच्या ढिग साचले असून कचरा नियमितपणे उचलला जावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक 15 बाबत “अ’ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे यांनी मागणी केली आहे.

शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसामुळे कचरा ओला झाला असून त्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे डेंगू, मलेरिया सारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात हा प्रश्‍न अत्यंत बिकट होत चालला आहे. याबाबत आपल्याकडे सातत्याने तक्रार करून देखील प्रश्‍न मार्गी लागला नाही. येत्या दोन दिवसांत कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावावा. रस्ते नियमितपणे साफ करावेत. कचरा उचलावा अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक अमित गावडे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)