सफाई कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशी संप मागे

संगमनेर – संगमनेर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 29 ऑक्‍टोबर रोजी लाक्षणिक संप पुकारला होता. मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर तिसऱ्या दिवशी हा संप मागे घेण्यात आला.

स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूर करणे, शहर सफाईसाठी रोजंदारीवर सफाई कर्मचारी नेमणे, रजेच्या मुदतीत बदली कर्मचारी नेमणे, नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक विमा नगरपालिका खर्चातून उतरविणे, सफाई कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ साप्ताहिक सुटी देणे, शासकीय सुट्यांचा जादा मेहनताना देणे, नगरपालिका आस्थपनेवरील सर्व रिक्तपदांवर अनुकंपतत्त्वावर वारसाची नेमणूक करणे, निवृत्तिवेतन विक्री प्रक्रिया पुन्हा सुरू करणे, 90 कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन योजना लागू करणे, 24 वर्षांची कालबद्ध पदोन्नती वेतनश्रेणी लागू करुन त्याचा फरक तातडीने देणे, वाल्मीक जयंतीला सुटीचे पैसे द्यावेत, यासह विविध मागण्यांसाठी नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या गेटसमोर संप सुरू केला होता.

त्यामुळे शहरात ठिकठिकाणी असलेल्या कचराकुंड्या कचऱ्याने ओसंडून वाहत होत्या. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही सुटली होती. बुधवारी दुपारी उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, नगरसेवक विश्वास मुर्तडक, नितीन अभंग, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, सोमनाथ पावबाके, राजेश गुंजाळ, न. प. कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबूराव पवार, उपाध्यक्ष अजय जेधे, अरुण गुंजाळ, अल्ताफ शेख, लक्ष्मण जोर्वेकर, राजेश जेधे, मनोज जेधे आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर मुख्याधिकारी डॉ. बांगर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी सफाई कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)