माध्यमिक सोसायटीत विरोधकांचा ठिय्या

चुकीचा सेवक आकृतीबंध रद्द करून बेकायदेशीर नोकरभरती थांबविण्याची मागणी

नगर – चुकीचा सेवक आकृतीबंध रद्द करून, बेकायदेशीर नोकरभरती प्रक्रिया त्वरीत थांबविण्याच्या मागणीसाठी माध्यमिक शिक्षक सोसायटीत विरोधी संचालकांसह परिवर्तन मंडळाने आज ठिय्या आंदोलन केले.

-Ads-

संस्थेचे सत्ताधारी संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता 30 सप्टेंबरच्या बैठकीमध्ये लिपिक व शिपाई पदाची वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन बेकायदेशीरपणे नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांचे हे कृत्य संस्थेच्या हितास बाधा आणणारे असून, यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान होऊन बदनामी होणार आहे.

सत्ताधारी संचालकांच्या जावई, पुतणे व नातेवाईकांना नोकऱ्या देण्यात आल्या असून, सभासदांच्या पाल्यांचे काय? तर जे सभासद मयत झाले त्यांच्या कुटुंबीयांना नोकरभरतीमध्ये न्याय मिळेल का हा प्रश्‍न आंदोलकांनी उपस्थित केला आहे. सत्ताधाऱ्यांनी 3 वर्षापुर्वी सर्वसाधारण सभेच्या वेळी जाहिरपणे सोसायटीच्या सर्व शाखा ऑनलाईन झाल्यास कर्मचाऱ्यांची गरज भासणार नसल्याचे सांगितले होते. त्या ऑनलाईनसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. तरीही ऑनलाईनची प्रक्रिया सुरळीत चालू नसल्याचा आरोप बाबासाहेब बोडखे यांनी केला.

रोजंदारीवर घेतलेल्या संचालकांच्या नातेवाईक कर्मचाऱ्यांना तात्काळ कमी करावे, चुकीचा सेवक आकृतिबंध रद्द करावा व सभासद संख्येनुसार नवीन आकृतिबंध तयार करावा, बेकायदेशीर चालू केलेली नोकर भरती त्वरीत रद्द करावी, संस्थेत चालू असलेला मनमानी व हुकूमशाही कारभार थांबवण्याची मागणी विरोधी संचालक व परिवर्तन मंडळाने करण्यात आली आहे. सदर मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन चालू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, आर. जे. धस, भाऊसाहेब जिवडे, गणेश भगत आदी सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)