सोशल मीडियातून पाकिस्तानवर “स्ट्राईक’; हवाई दलावर कौतुकाचा वर्षाव

पुणे – हवाई दलाने मंगळवारी केलेल्या कारवाईनंतर भन्नाट सुटलेल्या सोशल मीडियाद्वारे अनेक प्रकारचे कॉमेन्ट करून पाकिस्तानवर अक्षरश: “सोशल सर्जिकल स्ट्राईक’ केला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहेच; परंतु पाकिस्तानसह देशातील विरोधकांवरही शरसंधान करण्यात आले आहे.

यामध्ये “ये नया हिंदुस्थान है, घर मे घुसेगा भी और मारेगा भी’ असे म्हणत सैन्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला, तर “हा तर मोठा घोटाळा आहे, आपण राफेल आणले आणि मिराज वापरले’, ” त्यांनी तर लष्कराचा अभ्यास केला होता, आपण हवाई दलाचा वापर केला, हे म्हणजे परीक्षेत अभ्यासक्रमा बाहेरचाच प्रश्‍न पडला की, 2016 मध्ये लष्कराचा सर्जिकल स्ट्राइक, “2019 मध्ये हवाई दलाचा सर्जिकल स्ट्राइक झाला आता नौसेना विचारात आहे की आपली पण वेळ येईल,’ “आज राजकुमार का फेमस डायलॉग याद आ रहा है, “हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे लेकिन वो बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा, बस जमीन तुम्हांरी होगी’, “मोदी ने दिखाया 56 इंच का सीना’ असे जोक करतच शत्रूला भारत किती सक्षम आहे याची जाणीव सोशल मीडियाच्या माध्यमातून करून देत पाकिस्तानची खिल्लीदेखील नेटिझन्सने उडविली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचवेळी “सॅल्युट एअर फोर्स’, “वायूसेनेचा विजय असो’, “भारतीय सैन्याला सलाम’ अशा भावना व्यक्त करत हवाई दलाच्या कामगिरीला अभिवादनही करण्यात आले. इतकेच नव्हे, तर आता या सर्जिकल स्ट्राइकबद्दल कोणी प्रश्‍न उपस्थित करत असेल तर त्याला “मिसाइल’ला बांधून पाकिस्तानवर सोडून द्या असा खोचक सल्लादेखील “नेटिझन्स’नी दिला. सोशल मीडियावर दिवसभर “हॅशटॅग सर्जिकल स्ट्राइक2.0′, “हॅशटॅग एअर स्ट्राइक’ हा ट्रेंड सुरू होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)