नेवासेमध्ये पोलीसांवर दगडफेक अन्‌ धक्‍काबुक्की 

नेवासे- तालुक्‍यातील रामडोह येथे सोमवारी रात्री जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या नेवासा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जुगाऱ्यांनी धक्काबुक्की करत पोलिसांवर दगडफेक केली. त्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात बाळकृष्ण शिवाजी गढेकर, किशोर सुदाम काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस कॉन्स्टेबल वासिम मुस्तफा इनामदार यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सोमवारी रात्री खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरुन रामडोह येथे एका ठिकाणी सुरु असलेला जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले असता पोलीसांना पाहून काही जुगाऱ्यांनी तेथून पळ काढला. जुगार अड्डा चालविणाऱ्या गढेकर व काळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली. जुगाऱ्यांनी धक्काबुक्की करत त्यांच्यावर दगडफेक केली. यामध्ये दोन्ही कर्मचारी या झटापटीत जखमी झाले असून त्याचवेळी पोलीस नाईक प्रीतम मोढवे तेथे गेल्याने गढेकर व काळे यांनी तेथून पळ काढला. पोलिस कॉन्स्टेबल वासिम इनामदार यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात बाळकृष्ण शिवाजी गढेकर, किशोर सुदाम काळे (दोघेही राहणार – रामडोह, ता. नेवासा) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)