परभणीच्या शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन 

कोल्हापूर – 15 – 2017 सालातील खरिपातील सोयाबीन पिक विमा ची रक्कम तात्काळ मिळावी या मागणीसाठी परभणीच्या शेतकऱ्यांनी कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातल्या ताराराणी चौकातील कार्यालयावर मोर्चा काढला. पीक विम्याची रक्कम जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या परभणी तालुक्‍यातील शेकडो शेतकऱ्यांनी 3 ऑक्‍टोबर 2018 रोजी कृषी मंत्री पाटील यांच्या घरासमोर उपोषणास सुरूवात केली होती. त्यावर 10 ऑक्‍टोबर रोजी मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विमा भरपाई देण्याचे लेखी आश्‍वासन शेतकऱ्यांना देण्यात आले होते.

या बैठकीत 15 दिवसांत कंपनीने पैसे दिले नाही तर राज्य सरकार विमा भरपाई निश्‍चित देणार, असे आश्‍वासन कृषीमंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले होते. परंतू चार महिने उलटल्यानंतरही विम्याची रक्कम मिळालेली नाही. किसानसभेने सातत्याने मंत्री व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. परंतू सरकारने आश्‍वासन पाळले नाही. त्यामुळे सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी परभणी तालुक्‍यासह लिमला मंडळातील शेतकरी किसान सभेच्या पुढाकाराने आज पासून पुन्हा एकदा कृषीमंत्री पाटील यांच्या कोल्हापुरातील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत उपोषणास सुरुवात केली आहे.
हे आंदोलन विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं यावेळी चारशेहून अधिक शेतकरी यात सहभागी झाले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)