श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘स्त्री’ चित्रपटाने देओल कुटुंबियांच्या ‘यमाला पगला दिवाना फिरसे’ चित्रपटाला मागे टाकत बॉक्स ऑफीसवर त्यापेक्षा जास्त कमाई केली आहे. ‘यमाला पगला दिवाना फिरसे’मध्ये धर्मेंद्र,सनी देओल, बॉबी देओल आहेत तर सलमान खानने देखील यात पाहुण्या कलाकाराचं भूमिका वठवली आहे आणि सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी देखील या चित्रपटात  नृत्य केले आहे. तगडी स्टारकास्ट असूनही ‘स्त्री’ चित्रपटाने बाजी मारली.

पहिल्या दिवशी ‘स्त्री’ चित्रपटाने ६.८२ कोटीची कमाई केली होती तर शनिवारी दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या व्यवसायात तेजी दिसून आली आणि या चित्रपटाने ९.५० कोटी रुपयांची कमाई केली. दोन दिवसात या चित्रपटाने १६.३२ कोटीच्या आसपास कमाई केली आहे. हा चित्रपट २० कोटींमध्ये पूर्ण झाला असून पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट त्यापेक्षा जास्त कमाईकरून हिट होईल अशी आशा केली जात आहे.

‘स्त्री’ चित्रपट हा भयपट आणि विनोदीपट अश्या प्रकारचा चित्रपट आहे. अश्याप्रकारचे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाहीत परंतु या चित्रपटात दिग्दर्शक अमर कौशिक यांनी ‘भय आणि विनोद’ यांचा परफेक्ट तडका लावून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याची व्यवस्था केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)