१९९१’च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार? शरद पवार दोन दिवस नगरमध्ये

शरद पवार दोन दिवस नगरमध्ये दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांबरोबर बैठक ; विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेणार

नगर: 1991 च्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याचे भाकीत करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात मोर्चोबांधणी करण्यासाठी खुद्द शरद पवार नगरला येत असून दोन दिवस नगरमध्ये राहून ते रणनिती ठरविणार आहेत. जिल्ह्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा ते घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पवार यांनी जातीने या मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरूवात केल्याने आता नेत्यांना काम केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुरूवातीपासून राष्ट्रवादीने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांच्यासाठी ही जागा कॉंग्रेसला न सोडण्याची भूमिका घेतली. अखेरच्या क्षणापर्यंत ना.विखे हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्यासाठी प्रयत्न करीत होते. पण राष्ट्रवादीने ही जागा सोडली नाही. त्यामुळे डॉ.विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अर्थात या निवडणुकीत 1991 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करणार असल्याचे पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीने डॉ. विखेंच्या विरोधात तरूण व उच्चशिक्षित उमेदवार दिला आहे. विखेंच्या विरोधात जोरदार मोर्चोबांधणी करण्यासाठी पवार सोमवारी दुपारी 3 वाजता नगरला येत आहे.

जिल्ह्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांबरोबर बाराही विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत. हा आढावा दुपारी 4 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या आढाव्यात मतदारसंघनिहाय दोन्ही पक्षांची ताकद, नेते व कार्यकर्त्यांची फौज याची माहिती घेवून त्यानुसार जबाबदारीचे वाटप देखील यावेळी करण्यात येणार आहे. या बैठकीत कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर रात्री नगर शहरातील व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत व्यापाऱ्याबरोबर पवार स्वतः चर्चा करणार असून पक्षाचे ध्येयधोरण सांगणार आहेत. त्यानंतर सकाळी जिल्ह्यातील भाजप व शिवसेना वगळता अन्य पक्षातील नेते तसेच राष्ट्रवादीपासून दूर गेलेल्या नेत्यांना पवार भेटणार आहे. मंगळवारी 11 वाजेपर्यंत ते नगरमध्ये थांबणार आहेत. या दौऱ्यात पवार निवडणुकीचे जेवढे होता येईल तेवढे नियोजन करणार आहेत. उत्तरेतील राष्ट्रवादीच्या नेत्यासह कार्यकर्त्यांना या मतदारसंघ प्रचार करण्यास सांगणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)