रणनीतिक महत्त्वाच्या चाबहार बंदराचे नियंत्रण भारताकडे

नवी दिल्ली: रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या इराणमधील चाबहार बंदराच्या कामकाजाचे नियंत्रण भारताकडे आले आहे.जहाजबांधणी मंत्रालयाने सोमवारी एका निवेदनाद्वारे ही गोष्ट जाहीर केली आहे. भारताने परदेशातील एखाद्या बंदराचे नियंत्रण करण्याची ही पहिलीच घटना आहे. इराणच्या दक्षिण किनाऱ्यावरील चाबहार बंदर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपासून अगदी जवळ आहे. चाबहार बंदरामुळे भारत आणि मध्यपूर्वेतील देशांमधील अंतरही कमी होणार आहे.

24 डिसेंबर रोजी झालेल्या एका त्रिपक्षीय करारानुसार शाहिद बेहिश्‍ती बंदर, चाबहारच्या एका भागाचे नियंत्रण भारताकडे आले आहे. भारत, इराण आणि अफगाणिस्तानच्या प्रतिनिधी मंडळांनी एकत्रितपणे चाबहार बंदरातील भारतीय कार्यालय इंडियन एसपीव्हीचे उद्घाटन केले. 29 डिसेंबर रोजी टर्मिनल एरिया, कार्गो हॅंडलिंग इक्विपमेंटस आणि ऑफिस बिल्डिंग भारतीय कर्मचाऱ्यांच्या ताब्यात आली. चाबहार बंदरामुळे भारत आता अफगाणिस्तानला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकेल. सायप्रसहून 30 डिसेंबर रोजी 72,458 मेट्रिक टन खाद्यान्ने घेऊन आलेल्या जहाजावरील माल भारतीयांनी उतरून घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चाबहार बंदराबाबत भारत आणि इराण यांच्यात 2003 मध्ये बोलणी सुरू झाली होती. मात्र त्यांना खरे यश मिळाले ते 2014 मध्ये. 2014 मध्ये भारत आणि इराणने चाबहार बंदराचा विकास करण्याच्या करारावर सह्या केल्या. 23 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इराण दौऱ्यात झालेल्या करारानुसार चाबहार बंदराचे नियंत्रण दहा वर्षांसाठी भारताला देण्यात आले आहे. चाबहारच्या विकासासाठी भारताने 85.21 दशलक्ष डॉलर्स (592 कोटी रुपये) खर्च केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)