मोबाईलवर अश्‍लिल संभाषण, अतिप्रसंगाचा प्रयत्न

महिलेची एसपींकडे तक्रार : पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोप

म्हसवड – महिलेस काहीजणांनी वारंवार फोन करुन अश्‍लील संभाषण करुन तसेच तिच्या घरात शिरुन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार देवूनही म्हसवड पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप करत संबंधित महिलेने थेट जिल्हा पोलीस प्रमुखांकडेच दाद मागितली आहे. आता तरी संबंधितांवर पोलिस कारवाई करणार असा सवाल महिला व तिच्या नातेवाईकांतुन विचारला जात आहे.

याबाबत पोलीस अधिक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, शेनवडी येथील हरिशचंद्र खिलारी, रायचंद खिलारी, संजय खिलारी, गणेश खिलारी हे मला वारंवार फोनवर व प्रत्यक्ष भेटून अश्‍लिल भाषेत संभाषण करत आहेत. दि.13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी एकटी असल्याचे पाहुन समाधान खिलारी याने घरात घुसुन माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुला केलेले कॉल रिकॉर्डिंग का केले, तुला कोण वाचवतंय तेच पाहतो, असे म्हणत गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मी आरडा-ओरडा केल्याने समाधान खिलारीने मला ढकलुन पळुन गेला. जाताना त्याने माझ्या गळ्यातील सोन्याची चेन तोडुन नेली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतरही मानसिक छळ संबधीतांकडुन सुरुच होते. त्यास कंटाळून मी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. माझ्यावर उपचार सुरु असताना म्हसवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी खाडे यांनी माझा जबाब नोंदवला. हा जबाब मागे घ्यावा, यासाठी सर्व गुंड मंडळी पोलीस कर्मचाऱ्यालाही हाताशी धरुन माझ्या आईला व सासुला दमदाटी करू लागले आहेत. त्यांच्या अश्‍लील संभाषणाची ऑडीओ क्‍लिप मी म्हसवड पोलीसांना सादर केली आहे. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. संबधितांवर कारवाई करावी, अशी मागी संबंधित महिलेने केली आहे.

राजकिय द्वेषातून आरोप : संजय खिलारी

याविषयी शेनवडीचे माजी सरपंच संजय खिलारी यांना विचारले असता ते म्हणाले की संबधीत महिला ही नातलग असून केवळ गावपातळीवरील राजकिय द्वेषापोटी हे षडयंत्र रचले गेले आहे. या प्रकणाची खरोखरच सी.आय.डी.मार्फत चौकशी व्हावी, याकरीता आम्हीच जिल्हा अधीक्षकांना पत्र देणार आहोत. यातून “दुध का दुध और पानी का पानी’ हे सिध्द होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)