#Betterindia: कहाणी रंगकलेतून आनंदनिर्मितीची

– कॅप्टन नीलेश गायकवाड

माणुसकीची भिंत या उपक्रमाची बरीच चर्चा झाली. पण बंगळुरुमधील एक कलाकार तरुणी आपल्या रंगकलेच्या जादूने भिंतींवर रंगकाम करून अनोखा संदेश देण्याचे काम करत आहे. ज्या मुलांना शाळेत जायला आवडत नाही त्या मुलांना एका अनोख्या पद्धतीने शाळेची गोडी लागावी यासाठी बंगळूरमधील एक कलाकार अनोखा प्रयत्न करीत आहे. दिव्या रामचंद्रन या तरुण आर्टिस्टने आजपर्यंत शंभरपेक्षा जास्त भिंतींवर आपल्या कुंचल्याची जादू दर्शवली आहे. यासाठी तिने “हॅपी वॉल्स’ हा प्रकल्प सुरू केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकल्पाची सुरवात दिव्याने तिच्या शाळेपासून केली. चेन्नई आणि बंगळूरमधील बऱ्याच सार्वजनिक भिंतींवर, घरे, शाळा, जीम, रेल्वे स्थानके, कॅफेमधील भिंती दिव्याने अत्यंत कौशल्याने रंगविल्या आहेत. बंगळूरमधील सृष्टी स्कूल ऑफ आर्ट डिझाईन ऍण्ड टॅक्‍नॉलॉजी येथे दिव्या डिझाईन हा विषय शिकविते. हॅप्पी वॉल्सविषयी बोलताना दिव्या म्हणाली,” या उपक्रमाची सुरवात फेसबुकमुळे झाली. मला फेसबुकवरून मोफत वॉल पेटिंगसाठी रिक्‍वेस्ट येऊ लागल्या. या निमित्ताने मी अनेक क्रिएटिव्ह लोकांच्या संपर्कात आले. या प्रकल्पाची पाळेमुळे रोवली गेली.”

या प्रकल्पात विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचा सक्रिय सहभाग असतो. या प्रकल्पाच्या निमित्ताने वेगवेगळ्या वयाच्या, व्यवसायातील व्यक्ती आणि समूहांकडून संभाव्य संकल्पना दिव्याला मिळाल्या. दिव्या सोबत हे काम करण्याचा अनुभव छान असल्याचे तेथील स्वयंसेवक सांगतात. यानिमित्ताने बरेच स्वयंसेवक, कलाकार प्रकल्पाशी जोडले गेले आहेत.

दिव्याच्या प्रत्येक वॉल आर्टचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक भिंत ही आपल्याला काही तरी सांगत असते. प्रत्येक भिंत ही सबंधित शहराची, संस्कृतीची, त्या ठिकाणाची, व्यक्तीची माहिती देत असते. अलीकडेच त्यांनी एका गिटार वादकाचे घर रंगविले. त्यावर म्युझिकल नोट्‌स रेखाटल्या आहेत. एका भिंतीवर शाळाबाह्य विद्यार्थांचे चित्र रेखाटले होते. ते पाहून ‘इंडिया फाऊंडेशन’मध्ये शिकविण्याची संधी दिव्याला मिळाली. चेन्नईमधील शाळाबाह्य विद्यार्थ्यांवर यानिमित्ताने एक प्रकाश पडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)