मोझंबिकमध्ये वादळामुळे अतिवृष्टी; 5 जणांचा मृत्यू

पेंबा (मोझंबिक) – मोझंबिकमध्ये केनिथ चक्रिवादळामुळे अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पूरसदृश्‍य स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये आतापर्यंत 5 जण मरण पावले आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. पेंबा शहरामध्ये एक आणि मकोमिया जिल्ह्यामध्ये अन्य काही एक मरण पावला. तर इबो बेटावर दोन जण मरण पावले आहेत. तर पाचवा मृत्यू कोठे झाला, याबाबतचा तपशील लगेच उपलब्ध होऊ शकला नाही.

उत्तरेकडील काबो दील्गादो प्रांतातील सुमारे 3,500 घरांचे अंशतः किंवा पूर्णपणे नुकसान झाले आहे. या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला असून एक महत्वाचा पूलही कोसळला आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नागरिकांना अन्न, पाणी आणि निवासाची गरज आहे, असे “केअर’ या स्वयंसेवी संस्थेने सांगितले.

केनिथच्या पार्श्‍वभुमीवर मोठा पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे. केनिथ चक्रिवादळाचा फटका तब्बल 7 लाख नागरिकांना बसण्याचा धोका मोझंबिकच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. पूराची तीव्रता वाढल्यास लाखो लोकांना अन्नधान्याची टंचाई भासू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)