बेकायदेशीर पदोन्नतीमुळे पशुवैद्यकीय विद्यार्थी संपावर

लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दहा मार्च दोन हजार एकोणीस रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली मात्र पशुसंवर्धन विभागाने सहाय्यक पशुधन विकास अधिकारी तक्रार महाराष्ट्र पशुवैद्यकीय संघटनेने केली आहे.खंडाळा तालुक्‍यातील शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी या संपात सहभागी झाले आहे गुरुवारी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शासनाचा निषेध आंदोलन केले तसेच विविध घोषणा केलेली फलक हातात घेऊन निषेधही केला.

शिरवळ – शासनाच्या नव्या आदेशात दोन वर्षे शिक्षण घेतलेल्या पदवीधारकांना एल डी ओमध्ये पदोन्नती देण्यात आली आहे . तर बीव्हीसी अँड ए एच या साडेपाच वर्षे शिक्षण घेतलेल्या पदविधारकांना डावलण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यार्थी संघटनेने आंदोलन पुकारले असून क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीही आंदोलनात सहभागी झाले आहेत.

शासनाने काढलेल्या 8 मार्चच्या आदेशात नुसार पशुधन पर्यवेक्षक एल एस एस पशुधन विकास अधिकारी ची पदोन्नती देण्यात आली आहे. सरकारने पदवीधारक पशुधन पर्यवेक्षकांना ,पशुधन विकास अधिकाऱ्यांना बी-ग्रेडच्या 125 जागा उपलब्ध करून दिले आहेत.त्यामध्ये ग्रेट वन पॉंलीक्‍लीनिक, मिनी व्हेटर्नरी पॉलीक्‍लीनिक, ब्रिडींग सेंटर या जागेवर पशुधन पर्यवेक्षक यांची वर्णी लागणार आहे .परंतु यामध्ये बी व्ही एस सी अँड ए एच या पदवीधारकांचा विचार करण्यात आला नाही

2014 साली पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात येणार होत्या. परंतु सरकारने जागा भरण्याकडे दुर्लक्ष केले. अपात्र असलेल्या 125 जागा भरण्यात आले आहेत .त्यामुळे राज्यात पाचही पशुवैद्यकीय विद्यालयातील विद्यार्थी व डॉक्‍टरांनी गेल्या दोन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पदविका प्राप्त करून सहाय्यक पशुधन विकास अधिकारी गट क या पदावर कार्यरत असलेल्यांना 1984 च्या भारतीय पशुवैद्यकीय कायद्यानुसार पशुधन विकास अधिकारी या पदावर पदोन्नती देता येत नाही . विशेष असे की सद्य स्थितीत पशुधन विकास अधिकारी गट ब या विभागात अस्तित्वात नाही यामुळे ही पद्धती बेकायदेशीर आहे या वेळेत हा संप असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)