पुसेसावळीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

खटाव तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी : दि. 10 पासून बेमुदत आंदोलन

पुसेसावळी – संपूर्ण खटाव तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा या मागणीकरीता पुसेसावळी विभागातील ग्रामस्थांनी दत्त चौकात खर्डा भाकरी खाऊन दिवाळी साजरी करत रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाच्या वेगवेगळ्या निकषांमुळे समाजात दरी निर्माण होत आहे, एखाद्या भागाला झुकते माप तर दुसऱ्या भागावर अन्याय केला जात आहे. यामुळे खटावसारख्या कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्‍यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी युवा वर्गाने वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून न्याय मागण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. त्यास विविध संघटना, लोकप्रतिनिधी यांनी आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलनामुळे सातारा, कराड, मायणी, कडेपुर रस्त्यावर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, आदोलकांच्या मागणीची दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणयात येईल, असे आश्वासन नायब तहसिलदार सुधाकर धाईंजे यांनी दिले. यावेळी धैर्यशिल कदम, ज्ञानदेव पवार, सुहास पिसाळ, सचिन नलवडे, सुहास शिंदे, प्रवीण मोकाशी, मानसिंग माळवे यांची मनोगते झाली. यावेळी पुसेसावळी विभागातील गावोगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायब तहसिलदार सुधाकर धाईंजे यांनी निवेदन स्वीकारले.

प्रशासनास खर्डा भाकरीचा दिवाळी फराळ भेट
खटाव तालुका दुष्काळी यादीतून वगळल्याच्या निषेधार्थ आंदोलकांच्या वतीने प्रशासनास खर्डा भाकरीचा दिवाळी फराळ भेट देण्यात आला. तसेच आंदोलनांवेळी शेतकऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांनीही खरडा-भाकरी खाऊन दिवाळी साजरी केली, यावेळी शासनाच्याविरोधात घोषणा देत खटाव तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनांवेळी औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल जाधव व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

“प्रशासन व पदाधिकारी यांनी आणेवारी देताना लक्ष देण्याची गरज होती परंतु याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शासनाने फेरसर्वेक्षण करुन तालुक्‍याचा दुष्काळी यादीमध्ये सामावेश करावा, अन्यथा जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागेल.
– धैर्यशील कदम, पुसेसावळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)