म्हसवड – मायणी रस्त्यावर ढाकणी येथे रास्ता रोको

म्हसवड – ढाकणी तलावात उरमोडीचे पाणी पिण्यासाठी सोडण्यात यावे, या मागणीसाठी ढाकणी व परिसरातील ग्रामस्थांनी आज म्हसवड मायणी रस्ता सुमारे दोन तास रोखून धरत प्रशासनाचा निषेध केला. शेकडो ग्रामस्थांनी या रस्तारोको आंदोलनात सहभाग घेतला होता.

सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सातारा यांना दि. 30 आक्‍टोबरला ग्रामस्थांनी पाणी सोडण्यासंदर्भात निवेदन देऊन ढाकणी तलावात उरमोडी प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी साठा उपलब्ध न झाल्यास दि. 05 नोव्हेंबरला रोजी ढाकणी येथे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको नंतरही पाणी तलावात न आल्यास ग्रामस्थांच्यावतीने दि. 12 रोजी दहिवडी येथील प्रांत कार्यालया समोर बोंबाबोंब आंदोलन केले जाणार आहे.

ढाकणी तलावातील पिण्यासाठी पाण्याचा वापर हा माणमधील 50 टक्के हुन अधिक ग्रामपंचायती करत आहेत. दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी संबंधीत अनेक गावांनी आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. सिंचन विभागाकडे दोन लाख रुपये उरमोडीच्या पाण्यासाठी भरुनही सिंचन विभाग पाणी देण्यास का टाळाटाळ करतेय हा प्रश्न आंदोलकांनी केला. पाणी आले नाहीतर यापुढील काळात उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

निवेदन नायब तहसीलदार पोटे यांनी ग्रामस्थांकडून स्विकारले.यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी सपोनि मालोजीराव देशमुख यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. आंदोलनात जयेंद्र खाडे, आप्पा खाडे, कृष्णात खाडे, दिलीप नरबट, मोहन नरबट, दत्ता ओंबासे, अंकुश भोसले, दिलीप तुपे, धनराज खाडे, दिगांबर गेंड, अमोल कांबळे, मल्हारी खाडे,आण्णा नरबट यांचेसह शेकडो जणांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. सुमारे दोन तास ग्रामस्थांनी रस्तारोको आंदोलन केल्याने दिवाळी सणासाठी यामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांचा दोन तास खोळंबा झाल्याने मनस्ताप सहन करावा लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)