महामार्गावर सुरु असलेले बांधकाम थांबवा

सातारा – भुईंज ता. वाई येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या क्षेत्रात गट क्रं 2378 मध्ये सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवावे आणि वाई पंचायत समितीच्या सभापतींवर पदाचा गैरवापर केल्याबदद्‌ल कारवाई करावी अशी मागणी भुईंज ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य अशा पंचवीस जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात नमूद आहे की सर्वे नं 2378 मध्ये प्रताप भोसले यांच्या मालकीची जमीन असून येथे विनापरवाना वाणिज्य इमारतीचे बांधकाम बेकायदेशीरपणे सुरू आहे. भोसले यांच्या सून वाई पंचायत समितीच्या सभापती आहेत. राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने हे काम बिनबोभाटपणे सुरू आहे. वाणिज्य वापराची इमारत अगदी महामार्गालगत असून तशी परवानगी ग्रामपंचायतीला देता येत नाही. तरीसुध्दा भुईंज ग्रामपंचायतीला अर्ज करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाणिज्य वापराची इमारत ही 75 मीटरच्या आत नसावी अशा स्पष्ट सूचना अध्यादेशित असताना सदर गट क्रमांकात वाणिज्य रहवास कसा सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गाने संपादित केलेल्या जागेत या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शासनाने या जमिनीचे मूल्य सुध्दा अदा केले आहे. अद्यापही या इमारतीवर रस्ते विकास महामार्ग यंत्रणेची कारवाई झालेली नाही. ही इमारत तातडीने पाडून वाई पंचायत समितीच्या सभापती यांना अपात्र करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)