Oman Quadrangular T20I series :
पुणे – चार देशांच्या टी20 क्रिकेट मालिकेतील ओमान विरूध्द आयर्लंड यांच्यातील दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडने ओमानचा 15 धावांनी पराभव केला आहे.
ओमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना आर्यंलंडच्या संघाने 20 षटकांत 5 बाद 159 धावां केल्या होत्या. प्रत्युत्तरात ओमानच्या संघास 20 षटकांत 9 बाद 144 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आल्याने त्यांना 15 धावांनी पराभव स्विकारावा लागला.
Captain @stirlo90 led from the front to help Ireland to a 15-run victory on the first day of the T20I quadrangular series against hosts Oman.#OMAvIRE REPORT ?https://t.co/PrcX3HWOV9 pic.twitter.com/9GlM03aVlu
— ICC (@ICC) February 13, 2019
आर्यंलडकडून गोलंदाजीत सिमि सिहं याने 3 षटकांत 15 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर फलंदाजीत पाॅल स्टर्लिंग याने 51 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटंकारासह सर्वाधिक 71 धावा केल्या. पाॅल स्टर्लिंगला या कामगिरीबदल सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
ओमानमध्ये चतुर्भुज टी20 क्रिकेट मालिका सुरू आहे. यामध्ये ओमान, आयर्लंड, नेदरलॅंड आणि स्काॅटलंड यांचा समावेश आहे.