शेतकऱ्यांना अजुनही प्रतिक्षा ऊसदराची; दर गुलदस्त्यात

कराड – राज्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर विभागातील सर्व कारखाने सुरु होऊन दोन ते तीन महिने झाले असले तरीही शेतकऱ्यांच्या ऊसाचा दर अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आला असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी तोडणी वाहतूक यंत्रणा व मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तोडणी मजूरांकडून ऊसाची तोड होऊन ती कारखान्यास घालून त्याचे गाळप झाले तरीही अद्यापही शेतकऱ्यांना ऊसबिलाची प्रतिक्षा करावी लागत आहे. परिणामी शेती उत्पादनासाठी घर खर्चासाठी शेतकरी आर्थिक परिस्थितीने संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे दैनंदिन व्यवहार ऊसाच्या बिलावर अवलंबून आहे. त्यामुळे कारखानदारांनी तात्काळ शेतकऱ्यांची ऊसाची बिले त्यांना देवून त्यांचे आर्थिक संकट दूर करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

मागणी करुनही कारखान्यांनी ऊसदर तसेच बिल जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी कारखाना व्यवस्थापनाला दिला आहे. या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी उतरून आपल्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही शेतकरी संघटनांनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)