अद्यापही 154 पीएसआय प्रतीक्षेतच 

मुख्यमंत्र्यांच्या सहीविना नियुक्ती पुन्हा लांबणीवर

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीमुळे राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील 154 पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण अर्थात मॅटच्या आदेशानंतर 154 जणांच्या नियुक्तीबाबतची फाईल गृहखात्यातील अधिकाऱ्यांच्या सहीसाठीच फिरवली जात होती. आता ही फाईल केवळ गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सहीमुळेच रखडल्याचे समजते.

मॅटचा आदेश आणि कॅबिनेटच्या निर्णयानंतरही सरळ सेवा परीक्षेतून उत्तीर्ण झालेले 154 पीएसआय अद्यापही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) यांनीही सर्व पीएसआयना सेवेत सामावून नियुक्तीबाबतचा पत्रव्यवहार गृहविभागाला केला आहे. परंतु मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणाच्या भूमिकेमुळे फाईल पुढेच सरकली नव्हती. आता गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिवांची स्वाक्षरी झाल्याने फाईल मुख्यमंत्री कार्यालयात पाठवण्यात आली आहे.

या सर्व 154 पीएसआयनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांना सेवेत सामावून घेऊ, असे स्वत: मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. आता केवळ मुख्यमंत्र्यांच्या सहीविना नियुक्ती लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही फाईल लवकर क्‍लिअर करुन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी या 154 पोलीस उपनिरीक्षकांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)