चौधरवाडीत कुत्र्यांच्या हल्ल्यात हरिण जखमी 

सोमेश्वरनगर: चौधरवाडी (ता.बारामती) येथे  कुत्र्यांच्या हल्ल्यात हरिण जखमी झाले. याबाबतची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आली त्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांनाही याविषयी माहिती देण्यात आली त्यानंतर डॉक्टरांनी या जखमी हरणावरती उपचार त्वरित  उपचार केले .

यावेळी वनरक्षक योगेश कोकाटे, वनकर्मचारी नंदकुमार गायकवाड चौधरवाडी गावातील पोलिस पाटील राजकुमार शिंदे, डॉक्टर तुषार बालगुडे, ज्ञानेश्वर भापकर, अक्षय भापकर, निखिल भापकर व भापकरमळा येथील ग्रामस्थ उपस्थित होते. चिंकारा जातीचा नर असल्याची माहिती व प्रथमोपचार केल्यानंतर हरणाला कात्रज येथील प्राणी अनाथालयात पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)