#ICCWorldCup2019 : सामन्या दरम्यान इंग्लंडच्या प्रेक्षकांकडून वॉर्नर, स्मिथची हुर्यो

लंडन – इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने इंग्लंडचा 12 धावांनी पराभव केला असला तरी हा सामना गाजला तो इंग्लंडच्या प्रेक्षकांच्या खराब वर्तवणुकी मुळे. या सामन्यात इंग्लंडच्या प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियन संघातील स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा हुर्यो उडवला असल्याने त्यांच्या वर्तनावर सगळीकडे टिका केली जात आहे.

चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी वॉर्नर आणि स्मिथ यांच्यावर लादलेल्या एक वर्षांच्या बंदीनंतर या दोन्ही खेळाडूंचे नुकतेच ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन झाले. शनिवारच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याच्यासमवेत दुसरा सलामीवीर म्हणून वॉर्नर जेव्हा मैदानावर दाखल झाला, त्यावेळी एका प्रेक्षकाने “फसवेगिरी करणारा वॉर्नर तू बाहेर निघ’ अशा स्वरूपाची घोषणा दिली. तसेच वॉर्नर मैदानावर येताच तोंडातून आवाज काढत प्रेक्षकांनी त्याची खिल्ली उडवली.

त्यानंतर दोन गडी बाद झाल्यानंतर स्मिथ जेव्हा खेळायला आला, त्यावेळी त्यालादेखील ‘चीट, चीट, चीट’ करून चिडवण्यात आले. स्मिथने प्रथम 50 आणि नंतर 100 धावा केल्यानंतरही काही प्रेक्षकांनी आवाज काढत त्याची चेष्टा केली

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)