नाविन्याचा शोधकर्ता स्टीव्ह

If today were the last day of your life, would you want to be doing what you are doing?

तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना स्टीव्ह दररोज आरशात पाहून हा प्रश्‍न स्वत:ला विचारत असे! आणि याचे उत्तर नाही असे आले तर आपल्याला बदलण्याची गरज आहे, असे त्याच्या मनात येई. मग आपल्या वेळेचा तो अधिक योग्यप्रकारे वापर करीत असे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटा वेगळ्या असल्या तरी प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा करावाच लागतो. संघर्ष करीत असताना आपण ज्या मार्गावरून जात असतो, तो मार्गच आपली यशस्विता सिद्ध करीत असतो. स्टीव्ह जॉब्स हे एक असे रसायन आहे, ज्या व्यक्तीने मानवाचे जीवन सुखकर बनविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. तंत्रज्ञाच्या क्षेत्रामध्ये जागतिक दर्जा निर्माण करीत आपले वेगळेपण जपले.

आपल्या आईचे असलेले एका मुलावरील प्रेम आणि त्या प्रेमातून झालेला आपला जन्म! यातून आईने आपले असणे स्वीकारले नाही. त्यामुळे आपल्याला दत्तक घेतलेल्या आई-वडिलांनी लहानाचे मोठे केले. लहानाचे मोठे होत असताना दत्तक म्हणून स्टीव्हकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जायचे. मात्र, त्याच्या आई वडिलांनी त्याला स्पष्ट सांगितले कि, you are a special child हा स्पेशल मुलगा इतका मोठा होईल असे त्यावेळी कोणालाच वाटले नसेल. आपल्या स्वतःच्या कंपनीतून आपल्याला काढून टाकले जाणे ही खूप जिव्हारी लागणारी गोष्ट स्टीव्ह यांच्याबाबत घडली. Apple या जगप्रसिद्ध कंपनीची स्थापना त्यांनी केली होती. कालांतराने काही कारणास्तव त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले. तत्कालीन स्थितीमध्ये स्टीव्ह यांनी लढणे न सोडता नाविन्याचा ध्यास घेत नेक्‍स्ट आणि पिक्‍सार या जगप्रसिद्ध कंपन्यांची स्थापना केली. काही काळाने Apple ने नेक्‍स्टला विकत घेतले आणि स्टीव्ह हे पुन्हा Apple मध्ये दाखल झाले. त्यांनी मकॅन्टोस संगणक, आयपॉड, आयपॅड आणि आयफोन या उपकरणांची निर्मिती करीत क्रांती घडवून आणली.

महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या स्टीव्ह जॉब्स यांना Stanford Universityने आपल्या पदवीदान समारंभात मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांनी केलेले भाषण सर्वांनी ऐकावे असे आहे. एक जगप्रसिद्ध भाषण म्हणून त्याकडे पाहिले जाते. यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील तीन गोष्टींवर भाष्य केले.Connecting the dots, Love & Loss आणि Death या बाबींवर सविस्तर सांगितले आहे. याच त्या गोष्टी आहेत ज्या त्यांना जगण्याचे बळ देऊ शकल्या.

काहीवेळा आपल्या आयुष्यामध्ये काय होत आहे, याचे आपल्याला भान नसते. मात्र, आपण करीत असलेल्या कामावर विश्‍वास ठेवत, आपण पुढे गेले पाहिजे. आपल्याकडे मर्यादित वेळ आहे, तो दुसऱ्यांच्या आयुष्यावर खर्च करू नका म्हणत स्टीव्ह यांनी दर्जा, प्रतिभा, नाविन्य, वेगळेपण जपत Appleचे एक वेगळे विश्‍व तयार केले.

अध्यात्म आणि शांततेच्या शोधामध्ये स्टीव्ह काहीकाळ भारतात राहायला आले होते. स्वतःला दुर्धर आजार झाला असतानाही त्यावर मात करीत ते शेवटपर्यंत लढत राहिले. सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या स्टीव यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले भरीव असे योगदान दिलेले आहे. Stay hungry. Stay foolish असा सल्ला देत जगणाऱ्या स्टीव्ह यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन.

– श्रीकांत येरुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)