पाकिस्तानवर कडक कारवाई करण्यासाठी पाऊल उचलावे – अशोक चव्हाण

सोलापूर – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत. या हल्ल्याचे राजकारण करणार नाही. परंतु सरकारने पाकिस्तानवर कडक कारवाई करण्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

मनसेबाबत अद्याप निर्णय नाही
आगामी निवडणुकीसाठी मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आलेला आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात मतभिन्नता आहे. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी आणि केंद्रातील नेत्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मुळेगाव येथे रविवारी सकाळी बंजारा समाजातर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. दहशतवादी हल्ला होणार असल्याची कुणकुण लागली असतानासुद्धा त्या ठिकाणी काळजी न घेतल्याने भारताच्या 42 जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता न थांबता पाकिस्तानच्या मुसक्‍या आवळण्यासाठी धडक कारवाई होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपाला सरकार चालवणे जमत नाही. सुमारे 14 हजार शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या आहेत. दुष्काळ जाहीर केला. मात्र शासनाने दुष्काळ निधी दिलेला नाही किंवा विजबिल माफ केले नाही. याशिवाय विध्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसुद्धा दिलेली नाही. एकूणच निष्क्रिय ठरलेल्या भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या संवेदनासुद्धा कळत नाहीत. या सरकारला खाली खेचल्याशिवाय पर्याय नसल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

भाजपाकडे गाजराची पुंगीसुद्धा वाजवायला पैसे नाहीत हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव यांचे वक्तव्य बरोबर असल्याचेही चव्हाण म्हणाले. सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा बिनदिक्कतपाने लढवावी, आम्ही पाठीशी राहू अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)