गुगल मॅप्समध्ये आता ‘स्टे सेफर’ फिचर 

नवी दिल्ली – बऱ्याचदा आपल्याला रात्री अपरात्री घरी जाण्यास उशिर होतो अशा वेळी आपण रिक्षा किंवा टॅक्‍सीचा पर्याय निवडतो. मात्र, अनेकदा हे रिक्षावाले किंवा टॅक्‍सिवाले आपल्याला रस्ता चुकवून लुटतात. मात्र, आता गुगलने यावर उपाय शोधला असुन प्रवासादरम्यान जर आपली गाडी चुकिच्या रस्त्याने जात असेल तर गुगल मॅप्सचे स्टे सेफर हे नविन फिचर आता आपल्याला रस्ता चुकल्याची सुचना देणार आहे. त्याच बरोबर हे फिचर तुम्ही सध्या प्रवासादरम्यान कोठे पोहचला आहात याचे लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची सुविधा देखील देते आहे.

यावेळी गुगलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागिल काही महिन्यांमध्ये त्यांनी भारतात केलेल्या सर्वेक्षणामध्ये येथील नागरीक आपल्या आणि आपल्या संबंधीतांच्या सुरक्षेवरुन फार चिंतीत असतात त्यातल्या त्यात परक्‍या शहरात अथवा राज्यात नोकरी कामानिमित्त जाण्यापुर्वी घाबरलेले असतात. त्यामुळे गुगलच्या संशोधकांनी या संदर्भात नविन फिचर सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे फिचर आता गुगल मॅप्सच्या आगामी अपडेट सोबत भारतात वापरायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)