राज्यभरात सूर्य’जाळ’

पुणे – राज्यात सर्वत्र सूर्य आग ओकू लागला आहे. अनेक भागातील तापमान हे 40 अंशांपुढे गेले आहे. मार्चमध्येच तापमानाने चाळीशी पार केली असल्याने एप्रिल आणि मेमध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

राज्यातील बहुतांशी भागात आता तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. प्रत्येक ठिकाणी सरासरी तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली आहे. विदर्भात तर उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळिशीपार गेल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. यात जळगाव, सोलापूर, परभणी, अकोला, चंद्रपूर, वर्धा येथे तापमान 41 अंशांच्या वर गेले आहे. तर नांदेड, ब्रह्मपुरी, वाशिम, यवतमाळ येथे 40 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, पुण्यातही तापमानाचा पारा 40अंशापर्यंत पोहचला आहे. गेले दोन दिवसांपासून शहरात तापमानाचा पारा हा 40च्या जवळपास आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके बसत आहेत, त्यामुळे नागरिक सुद्धा दुपारच्या वेळेत घराबाहेर पडत नसल्याने रस्त्यावरील वाहतूकही तुरळक झाली आहे.

बेमोसमी पावसाची शक्‍यता
राज्यात उद्यापासून (शनिवार) कोकण विभाग वगळता इतर ठिकाणी पावसाला पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी बेमोसमी पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)