राज्यव्यापी बंद आंदोलनात 7500 शाळा सहभागी

सातारा – ईसा संघटनेच्या राज्यव्यापी इंग्रजी शाळा बंद आंदोलनात राज्यातील 7500 शाळानी बंदमध्ये सहभाग नोंदवला असल्याची माहिती पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दिलीप वेलीवट्टी यांनी दिली. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोरगे, संघटनेचे मनिंनदर कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) संघटना गेल्या 5 ते 6 वर्षापासून इंग्रजी शाळांच्या विविध प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम करत आहे. इंग्रजी शाळांच्या समस्यांबद्दल अनेक वेळा शासन दरबारी वेगवेगळया माध्यमातून निवेदने देण्यात आली असता शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून नाईलाजास्तव संघटनेला राज्यव्यापी इंग्रजी शाळांचा बंद आंदोलन करावे लागले असल्याची माहिती संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दिलीप वेलीवट्टी यांनी दिली. ते म्हणाले, 1 नोंव्हेबर 2018 चा शासन निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा व वर्ष 2012 ते 2019 पर्यंत आरटीई 25 टक्के प्रवेशाचा थकीत फी परतावा तातडीने अदा करावा, राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा सुरक्ष कायदा करण्यात यावा, 18 नोव्हेंबर 2013 च्या शासन आदेशामध्ये दुरूस्ती करण्यात यावी, शालेय विद्यार्थ्यासाठी वाहतूक संदर्भामध्ये मुख्याध्यापकाऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकावर ही जबाबदारी सोपवण्यात यावी, स्वयं अर्थसहायीत तत्वावर दर्जा वाढ प्रस्तावांसाठी ऑनलाईन प्रक्रिया तातडीने सुरू करावे अशा मागण्याचे निवेदन आज सातारा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी ईसा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र धायमा, पुणे सचिव राजेंद्र सिंघ व महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी अमित कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)