भाजपाच्या लोकप्रियतेत झपाट्याने घट : योगेंद्र यादव

शेती आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांचा होत आहे परिणाम

नवी दिल्ली – भाजपाच्या लोकप्रियतेत झपाट्याने घट होत आहे. ग्रामीण अस्वस्थता, बेरोजगारी ही त्याची कारणे आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ कमी होण्याची शक्‍यता असल्याचे निवडणूक विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी मह्टले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा निवडणुकीत हिंदी पटट्यात भाजपाला चांगलाच फटका बसेल, असा अंदाज असून भाजपाला 2014 च्या तुलनेत 100 जागा कमी मिळतील. भाजपाला 150 जागा मिळाल्या तर हातातून सत्ता जाण्याची शक्‍यता आहे. जर 200 जागा आल्या तर इतर पक्षांची सोबत घेऊन सत्ता स्थापन करू शकतात, असे यादव यांनी म्हटले आहे.

भाजपाला किती जागा मिळतात यामध्ये ग्रामीण अस्वस्थता, बेरोजगारी आणि राफेल करार हे महत्त्वाचे मुद्दे ठरतील असे ते म्हणाले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या 83 जागा आहेत. राजस्थानमध्ये लोकांना सत्ताबदल करायचा होता हे स्पष्ट झाले, पण इतर राज्यांमध्ये तसे चित्र नव्हते. कॉंग्रेसने तळागळापर्यंत जाऊन प्रचार केला ज्याचा त्यांना फायदा झाला. ग्रामीण भाग व शेतकऱ्यांचाही भाजपावर काही प्रमाणात रोष होता असे यादव यांनी सांगितले.

छत्तीसगडमध्ये 2500 रुपयात धान्य खरेदीचे आश्वासन कॉंग्रेसला फायद्याचे ठरेले. शेतकऱ्यांनी धान्याची विक्री निकाल लागेपर्यंत थांबवली यावरून हे स्पष्ट होते असे यादव यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या रोषामुळेच भाजपाचा पराभव झाल्याचे मत सगळीकडे व्यक्त होत आहे. परिणामी आता प्रत्येक राज्य शेतकऱ्यांच्या भल्यासाठी विविध सवलतींचा वर्षाव करत आहे. जे चार वर्षात राजकारणी शिकले नाहीत ते चार दिवसांत शिकल्याचे बघायला मिळाल्याचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांसाठी काय केले हे दाखवण्यासाठी भाजपाकडे काहीही नाही. बेरोजगारीचे प्रमाण एकूण पाच टक्के असून पदवीधारकांमध्ये तब्बल 16 टक्के बेरोजगारी आहे. राफेलबाबत भाजपा विषय बदलायचा प्रयत्न करण्याची शक्‍यता आहे. राम मंदिर, भारत-पाकिस्तान, हिंदू-मुस्लीम, मोदी विरुद्ध राहुल असे मुद्दे निवडणुकीपूर्वी काढून भाजपा लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकतो असा इशारा यादव यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)