विराटच्या आक्रमकतेत काही गैर नाही – झहीर खान

पर्थ कसोटीतील पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या त्यातल्या त्यात फलंदाजांच्या खराब कामगिरी पेक्षा कर्णधार विराट कोहलीचा आक्रमकपणा हा चर्चेचा सर्वात विषय राहिला आहे. कोहलीच्या या आक्रमकतेवर भारताचा माजी कसोटीपटू संजय मांजरेकरसह ऑस्ट्रेलियाच्या माईक हसी आणि मिचेल जॉन्सन यांनी टीका केली. मात्र, भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याने कोहलीला मैदानावरील आक्रमकता ही गैर नसून ती त्याने कायम ठेवायला हवी असा सल्ला दिला आहे.

यावेळी बोलताना झहीर म्हणाला, कोहलीला मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा सल्ला देतो. यशस्वी होण्यासाठी कोहलीला ज्या मधून प्रेरणा मिळते ते त्याने करायला हवे. त्याने यशस्वी होण्याचा मंत्र सोडू नये. मग त्याने लोक काय म्हणतात याचा विचार न केलेलाच बरा. जेंव्हा तुम्ही ऑस्ट्रेलिया दौरा करता तेंहा तुम्हाला असेच राहावे लागते. असेही त्याने यावेळी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच भारताचा माजी जलदगती गोलंदाज प्रविण कुमारनेही झहीरच्या वक्तव्यावर सहमती दर्शवली. प्रविण कुमार यावेळी म्हणाला की, अंडर 16, अंडर 19 आणि रणजी करंडक स्पर्धेतही कोहली याच आक्रमकतेने खेळतो. मग भारताकडून खेळताना त्याने ती आक्रमकता कायम राखली तर त्यात गैर काय झाले? त्याच्यासोबत मी बरेच सामने खेळलो आहे आणि आक्रमकतेशिवाय तो उत्तम खेळ करूच शकत नाही. तो त्याचा स्वभाव गुणच आहे. त्यामुळे त्याने आपला आक्रमक स्वभाव न सोदता खेळ करावा असा माजा सल्ला आहे असेही तो यावेळी म्हणाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)