राज्याचे धोरणच बिल्डरधार्जिण- धनंजय मुंढे

मुंबई – मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या कौसरबाग इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली 40 ते 45 जण अडकले असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी या दुर्घटनेला सरकारच जबाबदार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे.

‘डोंगरी भागातील दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत पुनर्विकास यादीत होती मात्र त्यावर निर्णय घेतला गेला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात इमारत पुनर्विकासाबाबतची एक बैठकही घेतली नाही’.

मात्र, ‘इमारत पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर असताना सरकार वारंवार दुर्लक्ष करत आहे. म्हाडाबाबत कोणतेही निर्णय सरकार घेत नाही. मुळात फडणवीस सरकार आल्यापासून या राज्याचे धोरणच बिल्डरधार्जिण झाले आहे. डोंगरातील घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई करा’. असं त्यांनी म्हंटल आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)